Friday, 14 March 2008

मी दारु प्याली नाही.....

आमची प्रेरणा संदीप खरे यांची 'मी मोर्चा नेला नाही' ही कविता......
(संदीप खरे यांची माफी मागुन)

मी दारु प्याली नाही...मी सिगारेट ओढली नाही
मी सुपारीसुद्धा साधी कधी खाल्लेली नाही

भवताली पार्ट्या चाले, त्या विस्फारुन बघताना
कुणी ग्लासातुन पिताना, कुणी बाटलीतुन पिताना

मी वेटर बनुनी शिरलो, डिस्कोच्या बाजुस जेव्हा
मला ऑर्डर द्यायलादेखील, कुणी बोलावले नाही

चेन स्मोकर मी झालो, चावल्या नुसत्याच काड्या
पावसात बेवडा झालो, थंडीत फुकल्या विड्या

पण खिशातुन कुठलीही पैशाची आवक नाही
कुणी मार आवरला नाही, कधी लॉटरी लागली नाही

मळलेला पारोसा सदरा, फाटलेली एकच चड्डी
गळ्यात अडकवुन टाकली तुटलेली लांबशी हड्डी

मी बाउंसरला भ्यालो, मी आंटीलाही भ्यालो
मी स्वप्नातसुद्धा माझ्या कधी पायरी चढलो नाही

मज जन्म व्होडकाचा मिळता मी स्मिरनॉफ झालो असतो
मी असतो जर का बीयर तर कोब्रा झालो असतो

मज पिता पिता कोणी रडले वा ओकले नाही
मी व्हिस्की झालो नाही! रमही झालो नाही!

6 comments:

सिनेमा पॅरेडेसो said...

JHAKAS ZALAY

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

वा ! चांगली जमली आहे कविता!

Mess up in Thought said...

अरे मित्रा.....मजा आली...!!

Vaidehi Bhave said...

mastach !! :D majjach ali vachun

Jaswandi said...

हेहे, मस्तच झाल्ये!

HAREKRISHNAJI said...

वाचुन दिल खुश झाले